सिंधुदुर्गात FDA ची जोरदार कारवाई; १२ जणांना 'व्यवसाय बंद'च्या नोटिसा

जिल्ह्यातील हॉटेल रेस्टॉरंट आणि अन्य खाद्य आस्थापनांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात८२ तपासण्या केल्या असून १२ जणांना 'व्यवसाय बंद'च्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारवाईतून एकूण एक लाख २० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात FDA ची जोरदार कारवाई; १२ जणांना 'व्यवसाय बंद'च्या नोटिसा
सिंधुदुर्गात FDA ची जोरदार कारवाई; १२ जणांना 'व्यवसाय बंद'च्या नोटिसा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील हॉटेल रेस्टॉरंट आणि अन्य खाद्य आस्थापनांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात८२ तपासण्या केल्या असून १२ जणांना 'व्यवसाय बंद'च्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारवाईतून एकूण एक लाख २० हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

या कार्यालयाने गुटखा विरोधी मोहिमही मोठ्या प्रमाणावर हाती घेतली असून आतापर्यंत सहा जणांवर कारवाई करून एकूण २२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा विरोधी ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते.

या कार्यालयाने आतापर्यंत विविध आस्थापनांकडून ४७ नमुने घेतले असून त्यापैकी १९ जणांना जणांना सुधारणा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तर १२ व्यवसयांना बंदच्या नोटीसाही देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांना सहकार्य करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसायिकांनी तपासणी होण्याची वाट न पाहता स्वतःच्या आस्थापनेची स्वतःच नियमित तपासणी करावी असे आवाहन केले आहे.

सिंधुदुर्गात FDA ची जोरदार कारवाई; १२ जणांना 'व्यवसाय बंद'च्या नोटिसा
राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नसुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याने व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सर्व व्यवसायिकांनी स्वच्छ पिण्याचे पाणी,योग्य कचरा व्यवस्थापन, स्वच्छ शौचालय व्यवस्था आणि स्वच्छ खाद्य हाताळणी व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेची ही नियमित काळजी घ्यावी असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. नियमांचे पालन हाच कारवाईपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in