सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आढळली ‘आफ्रिकन स्नेल’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आफ्रिकन स्नेल आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आढळली ‘आफ्रिकन स्नेल’
Published on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आफ्रिकन स्नेल आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आफ्रिकन स्नेल ही जगातील १०० सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते. ही साधारण १०-१५ सें.मी.पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वांत मोठ्या स्थलांतरित गोगलगायींपैकी ती एक आहे. ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एका वेळी १०० ते ४०० अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते.

माती, झाडे, शेतीमाल, वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलदगतीने ती सगळीकडे पसरते. एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचे वर्चस्व निर्माण करते.

महाराष्ट्रात यापूर्वी सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद व कोल्हापूर जिल्ह्यांत या प्रजातीची उपस्थिती नोंदली गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद आहे.

logo
marathi.freepressjournal.in