सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस खुर्दनजीकच्या वर्दे गावात शनिवारी सायंकाळी २५ वर्षीय महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या
सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्याप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

सिंधुदुर्ग : कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस खुर्दनजीकच्या वर्दे गावात शनिवारी सायंकाळी २५ वर्षीय महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी सहा पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

दामिनी पालव ही हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शनिवारी सायंकाळी तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी प्रयत्न केले जात आहेत. ओरोस येथील जिजामाता सर्कल परिसरातही तातडीने नाकाबंदी करण्यात आली असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. महाविद्यालयीन युवतीची हत्या करून आरोपी फरार झाल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in