Disha Salian's Death Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियाम मृत्यू प्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत
Disha Salian's Death Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली जात असताना राज्य सरकारने याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आता अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थानप होणार आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.अखेर मुंबई पोलिसांना याबाबतचे लेखी आदेश देण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. दिशा सालियानचा मालाडमधील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, या प्रकरणाचा संबंध हा सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी देखील जोडला जातो.त्यानंतर या प्रकरण चर्चेत आलं.

सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. या प्रकरणाचा कोणताही राजकीय संबंध नाही. दिशा सालियानचा मृत्यू हा इमारतीवरुन तोल गेल्याने झाला. असा निष्कर्ष सीबीआयने काढला होता. दरम्यान, आता एसआयटी स्थापन झाल्यानंतर काय खुलासे होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in