हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे
File Photo
File Photo

पेण तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हेटवणेे धरण 100% भरून ओव्हरफ्लो होत असल्याने या धरणाचे 6 दरवाजे एका फुटांनी उघडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकिनारी व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेण तालुक्यातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हेटवणे पूर्णतः भरले आहे. या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचेे 6 दरवाजे 1 फुटांनी उघडले आहे. त्यातुन 120 घन मिटर लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. दरवाजे केवळ सावधानता बाळगण्याकरिता उघडण्यात आले आहेत अशी माहिती हेटवणे धरणाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जाधव व उपविभागीय अभियंता आकाश ठोंबारे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या तरी पूरपरिस्थिती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in