गणेशोत्सवानिमित्त कोकणात अजून सहा विशेष गाड्या; आरक्षण २८ जुलै रोजी सुरू होणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेने आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात अजून सहा विशेष गाड्या; आरक्षण २८ जुलै रोजी सुरू होणार
Published on

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेने आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गणपती विशेष रेल्वेगाड्यांपैकी गाडी क्रमांक ०९००२, ०९०१०, ०९०१६, ०९४११, ०९१४९ या पाच विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलै रोजी सुरू होणार आहे.

मध्य आणि कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी सात रेल्वे गाड्यांच्या २०२ फेऱ्या चालविण्याची घोषणा केली होती. पण, २१ जुलै रोजी आरक्षण सुरू होताच सुरुवातीच्या आठ ते दहा मिनिटांत सर्वच्या सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाले. त्याचप्रमाणे आरक्षण साडेसातशेहून अधिक वेटिंगवर गेले. यानंतर आता पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून अजून सहा विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-ठोकूर (साप्ताहिक) विशेष तिकीट दरासह मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवार, ०३ सप्टेंबर, १० सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूर पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०९००२ ठोकूर-मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष तिकीट दरासह ठोकूर येथून दर बुधवारी ०४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल.

-गाडी क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी रोड (आठवड्यातील ६ दिवस) विशेष तिकीटदरासह मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावेल. २ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहचेल. गाडी क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष तिकीटदरासह सावंतवाडी रोडवरून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी धावणार आहे. तर ३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबई सेंट्रलला रात्री ८.१० वाजता पोहोचेल.

-गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद - कुडाळ (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह अहमदाबाद येथून ३ सप्टेंबर, १० सप्टेंबर, १७ सप्टेंबर रोजी म्हणजे दर मंगळवारी सकाळी ०९:३० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी कुडाळला पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९४११ कुडाळ - अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह कुडाळ येथून ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी म्हणजे बुधवारी पहाटे ४.३० वाजता पोहचेल. दुसऱ्या दिवशी अहमदाबादला रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.

-गाडी क्रमांक ०९१५० विश्वामित्री - कुडाळ (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह विश्वामित्री येथून २ सप्टेंबर, ९ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर रोजी दर सोमवारी सकाळी १० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळला पोहचेल. गाडी क्रमांक ०९१४९ कुडाळ - विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह कुडाळ येथून ३ सप्टेंबर, १० सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता विश्वामित्रीला पोहचणार आहे.

-गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद - मंगळुरू (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह अहमदाबाद येथून ६ सप्टेंबर, १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरु - अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह मंगळुरु येथून ७ सप्टेंबर, १४ सप्टेंबर, २१ सप्टेंबर सुटेल. तर, तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता पोहोचेल.

logo
marathi.freepressjournal.in