उदय सामंत हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक ; ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पुणे पोलिसांनी मध्यरात्री तपास करून कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरा १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
उदय सामंत हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक ; ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

शिवसेनेचे बंडखोर आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, बुधवारी त्यांना कोर्टात हजर केले असता सर्व आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला असतानाच दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रजमध्ये माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप होत आहे. यावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री तपास करून कारवाई केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in