मोहोळच्या खुनासाठी वापरलेल्या पिस्तुलाची मध्य प्रदेशातून तस्करी

पोलिसांनी हल्लेखोरांसह दहा जणांना ताब्यात घेतले आहे
मोहोळच्या खुनासाठी वापरलेल्या पिस्तुलाची मध्य प्रदेशातून तस्करी

कराड : पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा भागात झालेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खुनाच्या गुन्हयातील कराड कनेक्शन दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. मोहोळवरती पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ते हल्लेखोरांना कराडच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार धनंजय वाटकर याने पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तसेच वाटकर याने हे पिस्तुल मध्यप्रदेशातून तस्करी करून आणल्याचे समोर आले आहे.त्यामुळे वाटकर याच्यावर पिस्तुल तस्करीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. शरद मोहोळ याचा चार हल्लेखोरांनी खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस करत असताना पोलिसांनी हल्लेखोरांसह दहा जणांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मोहोळच्या खुनासाठी हल्लेखोरांनी वापरलेले पिस्तुल कराड शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार धनंजय मारुती वाटकर याच्याकडून घेण्यात आल्याची व वाटकर याने हल्लेखोरांना पिस्तुलसह काडतुसेही पुरवल्याचे उघड झाल्याने त्याला पुणे पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

वाटकर याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात विविध कलामांखाली विविधगुन्ह्यात गुन्हे दाखल आहेत तर काहींची दोषारोपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in