"...तर टोलचा पैसा जातो कुठे?" विजय वडेट्टीवार यांनी केली चौकशीची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली होती.
"...तर टोलचा पैसा जातो कुठे?" विजय वडेट्टीवार यांनी केली चौकशीची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलचा मुद्दा उचलला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर खासगी चारचाकी वाहनांना मोफत सोडण्यास सुरुवात केली. राज यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी, विरोधक सर्वाच्या टोल बाबत व्यक्त केलेल्या व्हिडिओ क्लिप दाखवल्या. देवेंद्र फडणवीस यांनी देखील लहान खासगी चारचाकी वाहनांना टोल माफी दिली असल्याची क्लिप व्हायरल झाली. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला.

राज्यातील टोलनाक्यावर लोकांची लूट होत असल्याच सांगत मनसेने वाहनांना सोडण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी मसने कार्यकर्त्याची धरपकड देखील केली. दरम्यान, काँग्रेसने देखील आता टोलप्रश्नी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील टोलमाफीचा निर्णय आम्हीच २०१४ साली घेतल्याचं सांगत चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याच्या वक्तव्याची पुनवरावृत्ती केली.

यावर विजय वडेट्टीवार यांनी सवाल खडा केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, वाहनमालकाकडून घेतले, तसंच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल ठाणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in