जगातील महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित विषय 'माती संवर्धन’

जगातला सर्वात महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजे जमीन म्हणजेच माती. पर्यावरण अभ्यासकांच्या मते वाढते शहरीकरण आणि दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या यामुळे
जगातील महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित विषय 'माती संवर्धन’

ओझोन वायूचा थर, कार्बनडाय ऑक्साइडचे वाढते प्रमाण, प्लॅस्टिक हे सर्व पृथ्वीच्या विनाशास कारणीभूत असल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र

जगातला सर्वात महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजे जमीन म्हणजेच माती. पर्यावरण अभ्यासकांच्या मते वाढते शहरीकरण आणि दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या यामुळे गेल्या काही वर्षांपासून आपण जमिनीचा वरचा थर नष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. जैवविविधता लाभलेल्या आणि नैसर्गिक आशीर्वाद असणाऱ्या भारत देशात आजही माती संवर्धनाबाबत कोणी बोलत नाही हे दुर्दैव असून माती नष्ट करण्यास आपण सर्वच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

मृदा म्हणजेच माती. प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड, रासायनिक खतांचा वापर, उद्योगधंद्यातून बाहेर पडणारे सांडपाणी यामुळे माती प्रदुषित होते. यासोबतच इतर अनेक कारणे आहेत, ज्यामुळे मातीत प्रदूषके मिसळतात. मातीचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज बनली आहे. मातीची जैवविविधता जेवढी जास्त राहिल तेवढे अन्नधान्याचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल. मात्र सध्याच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जमीन आणि जमिनीखालील जैवविविधतेला जास्त महत्त्व दिले जात नसल्याचे विविध उदाहरणांतून दिसून येत आहे. रासायनिक खते आणि केमिकल्सच्या बेसुमार वापरामुळे मातीचे स्वास्थ्य सर्वात जास्त धोक्यात आले आहे. त्यामुळे सर्वात जास्त मातीची जैवविविधता नष्ट होत आहे. मानवाकडून उद्योगधंदे आणि ग्रीनहाऊसमधून मोठ्या प्रमाणात कार्बन-डायऑक्साईड उत्सर्जीत केला जातो. हा अतिरिक्त कार्बनडायऑक्साईड झाडे, वनस्पती आणि पिके शोषूण घेतात. मातीतील सुक्ष्मजीवांच्या विघटनाद्वारे हा कार्बनडायऑक्साईड मातीत दिर्घ काळासाठी साठवला जातो. त्यामुळे वातावरण बदलात माती महत्त्वाची भूमिका निभावते. मात्र, नायट्रोजन असणाऱ्या खतांच्या वापरामुळे हा समतोल बिघडत असल्याचे फूड आणि अँग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने मागील वर्षी मृदा संवर्धना दिवशी आपल्या प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.त्यामुळे अन्न सुरक्षेसाठी मातीमध्ये जैवविविधता अंत्यत गरजेची आहे. जमिनीतील सूक्ष्मजीव जैविक आणि अजैविक घटकांचे पिकांसाठी लागणारे पोषण घटकात रुपांतर करतात. त्यांच्यावर पिकांची वाढ अवलंबून असते. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी जीवाणूच्या २७ हजार प्रजाती नष्ट होत आहेत. पुढील २५ ते ४० वर्षांनंतर ही स्थिती आणखी बिकट होईल. सूक्ष्मजीव केवळ तुमच्याच जमिनीत वाढवून उपयोगाचे नाही. ते सर्वत्र झाले पाहिजे. त्यासाठी जागतिक पातळीवर धोरणाची गरज असल्याचे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी मृदा संवर्धनाचा संदेश खेड्यांपासून शहरापर्यंत सर्वांसाठीच पोहचवणं गरजेचे बनले आहे. माती संरक्षणाची जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढे येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल असे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

पृथ्वी तलावावरील ४० टक्के जीवांचा त्यांच्या जीवनचक्रात मातीशी संबंध

जागतिक स्तरावरील फूड आणि अँग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने मागील वर्षी मृदा संवर्धन दिनाच्या निमित्ताने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात मातीच्या संवर्धानावर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगत जमिनीखाली सुमारे २५ टक्के जैव विविधता समावलेली आहे. पृथ्वी तलावावरील ४० टक्के जीवांचा त्यांच्या जीवनचक्रात मातीशी संबंध येतो. विविध प्रकारचे जंतू, जीवाणू, लहान प्राणी, सुक्ष्मजीव मातीत राहतात. पिकांच्या वाढीसाठी त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे मातीही सुस्थितीत राहते असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे माती संवर्धनासाठी जागतिक स्तरावरच प्रयत्न होणे गरजेचे आहे. मातीचे पर्यावरणशास्त्र जागतिक पातळीवर सुधारणे गरजेचे आहे.

नेदरलँडमधील नागरिकांना मातीचे मोल सर्वाधिक

नेदरलँड हा लहान देश. या देशातील परिस्थिती शेतीसाठी प्रतिकूल आहे. असे असतानाही सुधारित तंत्र वापरून पिकांची लागवड केली जाते. विशेष म्हणजे मुबलक पाणी असलेल्या या देशात मातीसाठी शेतकरी कासाविस होतात. माती किती महत्त्वाची आहे हे त्यांना चांगले माहित असून इथले शेतकरी ग्लास हाऊसमध्ये ‘माती विना शेती’ करतात. येथील शेतकरी आणि सरकारने शेती आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले आहे. प्रत्येक शेताच्या कडेने खोल चाऱ्या घेतल्या आहेत. ज्यामुळे पाणी निचरा चांगल्या प्रकारे होतो. परिस्थिती शेतीसाठी प्रतिकूल असली तरीदेखील सुधारित तंत्राने पिकांची लागवड करून दर्जेदार उत्पादन घेण्यात येथील शेतकरी आघाडीवर आहेत.

मातीतील सूक्ष्म जैवविविधता जपणे गरजेचे आहे. वनस्पतीला अन्न देणारे सूक्ष्मजीव मातीत असतात. मातीशिवाय झाडे तग धरू शकणार नाहीत हे तथ्य आहे.

अन्नसाखळीसाठी माती हा आवश्यक घटक आहे. शहरीकरणामुळे माती संपत चालली आहे. शासनाने इमारतींचे बांधकाम करण्यास परवानगी देताना काही ठराविक भाग हा राखीव ठेवण्याच्या सूचना देणे आवश्यक असून जेणेकरून त्यामुळे पाणी, मातीचा योग्य निचरा होईल.

- गुरुदास नूलकर, प्राध्यापक आणि प्रमुख हवामान बदल विभाग, सिम्बॉयसिस कॉलेज, पुणे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in