अकलूजच्या घोडेबाजारात साडेतीन कोटींची उलाढाल; मारवाड, काटेवाड, पंजाब, नुक्रा जातींच्या १,१८० घोड्यांची आवक; आतापर्यंत २७९ घोड्यांची विक्री

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २००९ मध्ये सुरू झालेल्या अकलूजच्या प्रसिद्ध घोडेबाजारात यंदा घोड्यांची मोठी आवक झाली आहे. मारवाड, काटेवाड, नुक्रा आणि पंजाब या जातींच्या तब्बल १ हजार १८० घोड्यांनी बाजारात हजेरी लावली आहे. २७९ घोड्यांची विक्री झाली असून, या व्यवहारांतून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
अकलूजच्या घोडेबाजारात साडेतीन कोटींची उलाढाल; मारवाड, काटेवाड, पंजाब, नुक्रा जातींच्या १,१८० घोड्यांची आवक; आतापर्यंत २७९ घोड्यांची विक्री
अकलूजच्या घोडेबाजारात साडेतीन कोटींची उलाढाल; मारवाड, काटेवाड, पंजाब, नुक्रा जातींच्या १,१८० घोड्यांची आवक; आतापर्यंत २७९ घोड्यांची विक्रीPM
Published on: 

सोलापूर : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २००९ मध्ये सुरू झालेल्या अकलूजच्या प्रसिद्ध घोडेबाजारात यंदा घोड्यांची मोठी आवक झाली आहे. मारवाड, काटेवाड, नुक्रा आणि पंजाब या जातींच्या तब्बल १ हजार १८० घोड्यांनी बाजारात हजेरी लावली आहे. २७९ घोड्यांची विक्री झाली असून, या व्यवहारांतून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरयाणा, गुजरात, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांतून घोडे विक्रीसाठी अकलूजमध्ये दाखल झाले आहेत.

अकलूजचा घोडेबाजार सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहारांसाठी प्रसिद्ध आहे. बाजारात येणारे व्यापारी आणि घोड्यांसाठी येथे मुबलक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गेल्या १७ वर्षांपासून घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी आपण सातत्याने अकलूजच्या बाजारात येत आहोत.

अशपाक अली,

व्यापारी, उत्तर प्रदेश अडीच फुटांच्या टॉय हॉर्सचीही चर्चा

यंदाच्या घोडेबाजारात भूतानमधून आलेला अवघ्या अडीच फूट उंचीचा आणि ३० महिन्यांचा अर्जुन हा टॉय हॉर्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याची किंमत १ लाख ५१ हजार रुपये सांगण्यात आली असून, खरेदीदारांकडून १ लाख ११ हजार रुपयांपर्यंत मागणी करण्यात आली आहे. कमी उंचीचा आणि मवाळ स्वभावाचा असल्याने लहान मुलांसाठी हा घोडा विशेष पसंतीस उतरतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांकडून मुलांसाठी असे घोडे पाळण्याची आवड दाखविली जाते.

‘सिकंदर’ आणि ‘बादशहा’ या घोड्यांना मोठी मागणी

अकलूजच्या घोडेबाजारात महागड्या आणि देखण्या घोड्यांचीही विशेष चर्चा आहे. इंदापूर येथील शिवगड स्टड फार्मचा पाच वर्षांचा पंजाबी नुक्रा जातीचा ‘सिकंदर’ हा पांढराशुभ्र आणि कमी उंचीचा घोडा खरेदीदारांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याची किंमत ५१ लाख रुपये सांगण्यात आली असून, त्याला २५ लाख रुपयांपर्यंत मागणी झाली आहे. विभूती रंगाच्या ‘कल्याणी’ घोडीची किंमत २५ लाख रुपये ठेवण्यात आली असून, तिच्यासाठी १८ लाख रुपयांपर्यंत बोली लागली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील व्यापारी अशपाक अली यांच्या पाच वर्षांच्या देखण्या ‘बादशहा’ घोड्याची किंमत ३० लाख रुपये सांगण्यात आली आहे. मात्र, त्याला १७ लाख रुपयांपर्यंत मागणी झाली आहे. तसेच राकट रंगाच्या ‘गोल्डन’ घोडीची किंमत १५ लाख रुपये असून, तिच्यासाठी ११ लाख रुपयांपर्यंत बोली लागली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)