Solapur : एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Solapur : एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
Solapur : एकाच कुटुंबातील तिघांची हत्याप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आई, मुलगी आणि मुलाची एकाच वेळी हत्या झाल्याने संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे. गायत्री सुधाकर मस्के (४०), मुलगी प्रिया मस्के (१८) आणि मुलगा शिवराज मस्के (१६) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आई आणि दोन मुलांवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह घराच्या गच्चीवर तर शिवराज याचा मृतदेह हा बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून या घटनेच्या संदभनि तातडीने तपास सुरु करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in