सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनल विजयी

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १९ संचालक मंडळ सदस्यांपैकी तब्बल १८ जागांवर भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर केवळ एका जागेवर अर्जुनसिंह मोहिते- पाटील प्रणित पॅनलच्या उमेदवाराला विजय मिळवता आला आहे.
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनल विजयी
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनल विजयी
Published on: 

सोलापूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १९ संचालक मंडळ सदस्यांपैकी तब्बल १८ जागांवर भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर केवळ एका जागेवर अर्जुनसिंह मोहिते- पाटील प्रणित पॅनलच्या उमेदवाराला विजय मिळवता आला आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली. बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी १० जागा भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या लढतीत ८ जागा जिंकून भाजपने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता राखली. मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एक जागा जिंकता आली.

विजयी उमेदवार

भाजप प्रणित पॅनलचे राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, विक्रांत (बाळराजे) पाटील, सिद्धेश्वर आवताडे, यशराज शिंदे, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, शंभूराजे जगताप, सचिन कल्याणशेट्टी, अजिंक्यराणा पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी ८ जागांवर भाजप प्रणित पॅनलचे बाबासाहेब देशमुख, अर्चना घाडगे, शामल बागल, राजेंद्र बंदीछोडे, रणजितसिंह शिंदे, मनीष देशमुख, सूर्यादित्य साळुंखे, महादेव कांबळे हे विजयी झाले. फक्त एका जागेवर मोहिते पाटील पॅनलचे अर्जुनसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)