Kirti World Record : सोलापूरच्या कीर्तीने पोहण्यामध्ये गाठली जागतिक विक्रमाची 'कीर्ती'

अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटं पोहून तब्बल ३७ किमीचे अंतर कापत जागतिक विक्रम केला.
Kirti World Record : सोलापूरच्या कीर्तीने पोहण्यामध्ये गाठली जागतिक विक्रमाची 'कीर्ती'

सोलापूरची जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने अरबी समुद्रात तब्बल ७ तास २२ मिनिटं पोहत ३७ किमी अंतर पार करत एक जागतिक विक्रम केला. तिने गुरुवारी दुपारी १२ वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून पोहायला सुरुवात केली. ते ७.२२ मिनिटाला तिने गेट वे ऑफ इंडिया गाठले. गेली १० वर्षे ती पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. तर, हे लक्ष पार करण्यासाठी ती गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात दररोज ८ ते १० तास मार्कंडेय जलतरण तलावात सर्व करत आहे. गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील समुद्रात सुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.

कीर्तीने हा विक्रम गाठताच तिच्या कुटुंबीय, मित्र मंडळी आणि प्रशिक्षकांनी एकच जल्लाेष केला. एवढंच नव्हे तर सोलापुरात तिचे जंगी स्वागत करत तिची मिरवणूकदेखील काढण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने म्हंटले की, मुली वाचवा आणि मुलींना प्रोत्साहन द्या. तसेच, तिने प्रशिक्षक, सोलापूर प्रशासन आणि भराडिया कुटुंबाचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in