सॉलिस यानमार नवीन ट्रॅक्टर मॅाडेल जपानी तंत्रज्ञानासह लाँच करणार

प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ट्रॅक्टर श्रेणीचे बळ मिळालेली ही कंपनी तुर्कीमध्ये सर्वात वेगाने वाढणारा ट्रॅक्टर ब्रँडसुद्धा आहे
 सॉलिस यानमार नवीन ट्रॅक्टर मॅाडेल जपानी तंत्रज्ञानासह लाँच  करणार

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचा प्रमुख ब्रँड असलेला सॉलिस यानमार केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील बाजारपेठेतील आपली उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढवत आहे. जगातील चौथ्या क्रमांकाची ट्रॅक्ट्रर बाजारपेठ असलेल्या तुर्कस्तानमध्ये २०१३ मध्ये शानदार पदार्पण केल्याटनंतर या प्रिमियम ट्रॅक्ट्रर ब्रँडने आता त्या देशातील ट्रॅक्टर निर्यातीत क्रमांक १चे स्था‍न मजबूतपणे पटकावले आहे. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ट्रॅक्टर श्रेणीचे बळ मिळालेली ही कंपनी तुर्कीमध्ये सर्वात वेगाने वाढणारा ट्रॅक्टर ब्रँडसुद्धा आहे.

सॉलिस यानमारचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की, आम्ही तुर्कीच्या शेतांमध्ये यशस्वीपणे चालत असलेल्या सोलिस ट्रॅक्टर्सच्या ५,००० हून अधिक ग्राहकांचे आनंदी कुटुंब आहोत.आमच्या एस-२६ मॉडेलचा २०२१ च्या कॅलेंडर वर्षात ८८ टक्के मार्केट शेअर आहे आणि आम्ही तुर्कीमध्ये एकंदर ८ टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. आम्ही नुकतेच फेब्रुवारी आणि मार्च २०२२ मध्ये आयोजित इझमीर आणि कोन्या नॅशनल फेअरमध्ये ७५ एचपी सीआरडीआय ट्रॅक्टरचे अनावरण देखील केले व त्याचे खूप कौतुक झाले. आम्हीम आता आमच्या् कॉम्पॅक्ट ट्रॅक्टारची रेंज ३० एचपी पर्यंत वाढवत आहोत आणि ३ नवीन मॉडेल जपानी तंत्रज्ञानासह लाँच करून तुर्कीच्या बाजारपेठेत धमाका करणार आहोत. ”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in