पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी 

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांना श्रोते भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘छंद लागला’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला
पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी 
Published on

सध्या पावसाळ्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आहे. त्यामुळे हे गारगार वातावरण थोडे उबदार करण्यासाठी ‘तमाशा लाईव्ह’ घेऊन येत आहे एक ‘गरमा गरमा’ गाणे. नुकतेच हे गाणे पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. या वेळी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थितांना घायाळ केले. तर या कार्यक्रमात अधिकच रंगत आणली ती, ‘गरमा गरम’च्या गायिका वैशाली सामंत यांनी... यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह प्रवाशांनीही ‘गरमा गरम’वर ठेका धरला. एकंदरच मेट्रो स्थानकात सगळे जण ‘फील दि हीट’ चा अनुभव घेत होते. 

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांना श्रोते भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘छंद लागला’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रील्स बनवण्याचा छंद लावला आहे

‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक मेजवानी आहे. प्रत्येक गाण्याचा प्रकार वेगळा आहे. संगीतातील सगळे प्रकार एकाच चित्रपटात वापरल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ‘गरमा गरम’ गाणेही अप्रतिम बनवले आहे. अमितराज यांचे संगीत, क्षितीज पटवर्धन यांचे शब्द आणि यात भर म्हणजे उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन. एवढी तगडी संगीत टीम असल्यावर हे संगीत प्रेक्षकांना आवडणारच. आज मेट्रो स्थानकातील प्रवाशांचे प्रेम पाहता ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटगृहात ‘गरमा गरम’ कमाई करणार हे नक्की.’’

logo
marathi.freepressjournal.in