सोनियांनी ७० टक्क्यांहून अधिक निधी अल्पसंख्याकांवर खर्च केला; अमित शहा यांचा आरोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढविला.
सोनियांनी ७० टक्क्यांहून अधिक निधी अल्पसंख्याकांवर खर्च केला; अमित शहा यांचा आरोप

रायबरेली/प्रतापगड ­: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढविला. सोनिया गांधी यांनी आपला ७० टक्क्यांहून अधिक निधी अल्पसंख्याकांवर खर्च केला असून गांधी कुटुंब खोटे बोलण्यात वाकबगार आहे, असे शहा म्हणाले.

तुम्ही अनेक वर्षांपासून मतदान करीत आहात, तुम्हाला खासदार निधीतून काही मिळाले का, जर मिळाले नाही तर हा निधी कोठे गेला, हा निधी त्यांच्या व्होट बँकेकडे गेला. सोनिया गांधी यांनी ७० टक्क्यांहून अधिक खासदार निधी अल्पसंख्याकांवर खर्च केला, असा दावा शहा यांनी केला.

राहुल यांना पाच प्रश्न

रायबरेलीतील सभेत शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाच प्रश्न विचारले असून त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द केला, तो चांगला होता की वाईट, तुम्ही तिहेरी तलाक पुन्हा आणणार का, मुस्लीम वैयक्तिक कायद्याऐवजी समान नागरी कायदा असावा की नाही, सर्जिकल स्ट्राइक योग्य होते की अयोग्य, तुम्ही त्याचे समर्थन करता का, अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर तुम्ही तेथे का गेला नाहीत आणि अनुच्छेद ३७० रद्द करण्यास तुमचा पाठिंबा आहे का, असे सवाल शहा यांनी राहुल गांधी यांच्यासमोर ठेवले असून त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान त्यांना दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in