सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद हिच्या कारला सोमवारी रात्री मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला.
सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात
Published on

नागपूर : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद हिच्या कारला सोमवारी रात्री मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात सोनाली सूद गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूरमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोनाली सुखरूप असून पुढील काही दिवस ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल, असे तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वर्धा उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. सोनालीची कार एका ट्रकला आदळली, त्यावेळी कारमध्ये सोनालीसह तिची बहीण आणि भाचा असे तिघे जण होते. सोनाली आणि तिचा भाचा जबर जखमी झाले असून बहिणीला किरकोळ मार लागला आहे. कारच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला असून एअरबॅग्ज उघडल्यामुळे सोनाली या अपघातातून बचावली.

logo
marathi.freepressjournal.in