ज्यांनी मराठ्यांचा गळा दाबला तेच आता गळा काढत आहेत - मुख्यमंत्री

बुलढाण्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
ज्यांनी मराठ्यांचा गळा दाबला तेच आता गळा काढत आहेत - मुख्यमंत्री
Published on

जालन्यातील घटनेविरोधात मराठा सामाजाने आक्रमक भूमिका घेतली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी भाष्य केलं. आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "जालन्यातील घटनेमुळे मला दु:ख आहे. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक य़आता गळा काढत आहेत." असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आज बुलढाण्यात होणाऱ्या शासन माझ्या दारी कार्यक्रमात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.

जालन्याच्या घटनेची चौकशी होणार

यावेळी मराठासमाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोवर सरकार आणि मी स्वस्त बसणार नाही. असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. तसंच जालन्यातील पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसंच जे अतिरिक्त अधिक्षक आहेत. त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची देखील आमची तयारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळई म्हणाले.

मराठा समाज संयमी

यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमुळे न्यायालयातील आरक्षण रद्द झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मराठा आरक्षणाच्या समितीत असणाऱ्या अशोक चव्हाण यांनी त्यावेली काय केलं? असा सवाल देखील त्यांनी विचारला. महाविकास आघाडी सरकारने एकदाही आरक्षणासाठी प्रयत्न केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघायचे पण त्यांचा कधी कुणाला त्रास झाला नाही. मराठा समाज हा फार संयमी आहे. मराठा समाजाच्या मुक मोर्च्याला तुम्ही मुकामोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही. असही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in