पुण्यात शेजाऱ्याचा कुत्रा भुंकतो म्हणून स्पोर्टस गनमधून गोळीबार; गुन्हा दाखल करुन आरोप पोलिसांच्या ताब्यात

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील 'इक्वेव्ह लोकमंगल सोसायटी' झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडली आहे
पुण्यात शेजाऱ्याचा कुत्रा भुंकतो म्हणून स्पोर्टस गनमधून गोळीबार; गुन्हा दाखल करुन आरोप पोलिसांच्या ताब्यात

अनेक ठिकाणी प्राण्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडतात. अशी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यात सध्या पाळीव प्राण्यांच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर येत आहेत. असं असताना शेजाऱ्याचा कुत्रा भुंकतो आणि त्रास देतो म्हणून पुण्याचा हडपसर भागात एकाने रागाच्या भरात कुत्र्यावर स्पोर्टस गनमधून गोळीबार केला. यानंतर कुत्र्याच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोळीबार करणारा शेजारी अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील 'इक्वेव्ह लोकमंगल सोसायटी' झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. कुत्रा नेहमी त्रास देतो, या कारणावरुन त्याला एअरगनचा छऱ्या मारुन जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अली रियाज थावेर याला ताब्यात घेतलं आहे.

जखमी कुत्र्याचे मालक प्रीत विकास अग्रवाल यांनी या प्रकरणी तक्रार दिल्याने याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. अग्रवाल यांनी एक नावबाउंसी नामक कुत्रा पाळला होता.२१ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुत्रा सोसायटी समोरील रस्त्यावर बसला होता. यावेळी आरोपी अली रियाज थावेर यांने त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने गोळीबार केला. त्यामुळे या श्वानाला गंभीर इजा होऊन तो विकलांग झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in