एसटीचा आज ‘अमृत महोत्सवी’ वर्धापन दिन ; मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत २५ वर्षापेक्षा जास्त सेवा बजावणाऱ्या ५ चालकांचा होणार सत्कार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, एसटीचे सदिच्छा राजदूत जेष्ठ नेते मकरंद अनासपूरे हे कार्यक्रमावेळी उपस्थित राहणार
एसटीचा आज ‘अमृत महोत्सवी’ वर्धापन दिन ; मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत २५ वर्षापेक्षा जास्त सेवा बजावणाऱ्या ५ चालकांचा होणार सत्कार
Published on

१ जून, १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने एसटीचा ‘अमृत महोत्सवी’ वर्धापन दिन सोहळा ३ जून रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, एसटीचे सदिच्छा राजदूत जेष्ठ नेते मकरंद अनासपूरे हे कार्यक्रमावेळी उपस्थित राहणार आहेत.

या सोहळयाच्या निमित्ताने एसटीच्या कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच २५ वर्षापेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणाऱ्या ५ चालकांचा सपत्निक सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून कोरोना महामारीनंतर गेल्या वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या तीन विभांगाचा व २५० आगारापैकी गटनिहाय ९ आगारांचा सत्कार देखील केला जाणार आहे. याबरोबरच दुररर्शी प्रणालिव्दारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भुमिपुजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे काँक्रीटीकरण या कामाचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे एसटीच्या ७५ वर्षाचा इतिहास सांगणाऱ्या ‘एसटी विश्वरथ’ या वातानुकुलित फिरत्या बसचे उद्घाटन देखिल मुख्यमंत्री यांच्या हस्ते या वेळी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in