एसटी खड्ड्यात कोसळून २ ठार, २० जखमी

कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाट्याजवळच्या एका खोल खड्ड्यात एसटी बस कोसळली.
एसटी खड्ड्यात कोसळून २ ठार, २० जखमी
एसटी खड्ड्यात कोसळून २ ठार, २० जखमी(Photo-X)
Published on

पुणे: कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाट्याजवळच्या एका खोल खड्ड्यात एसटी बस कोसळली. या अपघातात चालकासह एक प्रवासी ठार झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरून प्रवास करताना गुंजाळवाडी फाटा परिसरात एसटीचे नियंत्रण सुटून ती खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात बसचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यात बस चालक आणि एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

एसटी खड्ड्यात कोसळून २ ठार, २० जखमी
छेडछाडीचा वाद : ११ जण पडले खड्ड्यात; एकाचा मृत्यू, भांडुपमध्ये SRAच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, तरुण आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून बसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले.

​आळेफाट्यात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातातील सर्व गंभीर जखमींना तातडीने आळेफाटा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in