पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उत्तर मांड नदीच्या पुलावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पटली झाली आहे. या अपघातात २० ते २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीवरुन कराडकडून साताराच्या दिशेने निघालेली एसटी बस ही विजापूर-सातारा बस उत्तर मांड नदीवर आल्यावर चाकलाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बस दुभाजकाला जाऊन धडकली. यानंतर बस पटली झाली.
बस पलटी झाल्याने त्याचा मोठा आवाज झाला. यामुले आजुबाच्या लोकांनी तात्काळ अपघाताच्या दिशेने धाव घेतली. यावेळी उपस्थितांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं. पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या अपघातात २० ते २५ जणांनी किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना कराड व उंब्रज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.