आता एसटीमध्ये UPIद्वारे काढता येणार तिकीट; वाहकांना दिले अँड्राॅईड तिकीट इश्यू मशिन्स, ५ महिन्यांत ३५ कोटी प्रवाशांनी घेतला लाभ

प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येणार...
आता एसटीमध्ये UPIद्वारे काढता येणार तिकीट; वाहकांना दिले अँड्राॅईड तिकीट इश्यू मशिन्स, ५ महिन्यांत ३५ कोटी प्रवाशांनी घेतला लाभ
Published on

मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांना 'यूपीआय' प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सर्व वाहकांसाठी अँड्राॅईड तिकीट इश्यू मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. जानेवारी ते मे महिन्यात १४ लाख ३२ हजार तिकिटांची विक्री झाली असून, यातून गेल्या ५ महिन्यांत ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

एसटीच्या गाड्यांमध्ये कॅशलेस सुविधा नव्हती. त्यामुळे एसटीच्या बसने प्रवास करताना रोख रक्कम घेऊनच प्रवास करावा लागत होता. ही बाब प्रवाशांना अडचणी ठरणारी होती. त्यामुळे प्रवाशांना कॅशलेस सुविधा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहकाच्या अँड्राॅईड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुट्या पैशामुळे प्रवाशांचे वाहकासोबत होणारा वाद आता या नव्या प्रणालीने कायमचे मिटवले आहेत. या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन केवळ ३ हजार ५०० तिकिटे यूपीआयने काढली. त्यामध्ये मे महिन्यात पाचपट वाढ होऊन प्रतिदिन २० हजार ४०० तिकिटे सरासरी घेतली आहेत. अर्थात, यूपीआय पेमेंटद्वारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १० लाख रुपये होते. आता मे, मध्ये ४५ लाख रुपये प्रतिदिन झाले आहे.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी वाहकाकडे यूपीआय तिकिटाची मागणी करीत होते. त्याचप्रमाणे या यूपीआय पेमेंटमु‌‌ळे सुट्या पैशांवरून होणारे वादविवाद टाळणार आहेत. यामुळे सहाजिकच प्रवाशांचा प्रवास सुखकर व समाधानकारक होईल. यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

यूपीआय पेमेंटद्वारे प्राप्त उत्पन्न-

महिना तिकीट संख्या उत्पन्न (लाखात)

जानेवारी १०९४९६ ३,१२,८७,२७७/-

फेब्रुवारी १३३१५७ ४,१०,७०,९४१/-

मार्च २०५९६१ ५,८६,५०,७८७/-

एप्रिल ३५०७३६ ८,७५,२३,९१०/-

मे ६३२६९० १४,०१,८२,७०७/-

एकूण १४३२०४० ३५,८७,१५,६२२/-

logo
marathi.freepressjournal.in