एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून महामंडळावर नामुष्की; ५६ टक्के वेतन देण्याची आली वेळ

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून अपेक्षित निधी उपलब्ध न झाल्याने महामंडळावर नामुष्की ओढवली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून महामंडळावर नामुष्की; ५६ टक्के वेतन देण्याची आली वेळ
Published on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून अपेक्षित निधी उपलब्ध न झाल्याने महामंडळावर नामुष्की ओढवली आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना नक्त वेतनाच्या ५६ टक्के पगार देण्यात येणार आहे. तर उर्वरित पगार पुढील दहा दिवसांत जमा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी देण्यासाठी शासनाकडे ९२५ कोटींचा निधी मागण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात २७२ कोटी ९६ लाख रुपये निधी उपलब्ध झाला. यापैकी ४० कोटींची रक्कम कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एसटी बँकेकडे भरावी लागली. यातच ८७ हजार कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यासाठी २७७ कोटी रुपये इतकी रक्कम लागते. तर पूर्ण वेतन देण्यासाठी ४६० कोटी रुपये इतकी रक्कम लागते. सरकारकडून अपुरा निधी उपलब्ध झाल्याने महामंडळापुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महामंडळाने अप्रेंटिस वेतन १०० टक्के, निवृत्त अधिकारी वेतन फरक १०० टक्के, तर नियमित कर्मचाऱ्यांच्या नक्त वेतनाच्या ५६ टक्के रक्कम आणि सुरक्षा रक्षकांचे ५० टक्के देयक अदा करण्याची सूचना महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तर राहिलेला पगार दहा दिवसांत जमा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in