एसटी महामंडळ आणखी ८ हजार नवीन बस घेणार

वाहतुकीचा विस्तार करतानाच एसटी महामंडळाने आपल्या ३४ हजार चालकांना बस चालवताना मोबाईल न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत
एसटी महामंडळ आणखी ८ हजार नवीन बस घेणार
PM

मुंबई : एसटी महामंडळ डिसेंबर २०२५ पर्यंत ८ हजार नवीन बस आपल्या ताफ्यात सामील करून घेणार आहे. सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार बसेस आहेत. राज्यातील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बस खरेदी करण्याचे ठरवले आहे.

आपल्या वाहतुकीचा विस्तार करतानाच एसटी महामंडळाने आपल्या ३४ हजार चालकांना बस चालवताना मोबाईल न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडपूर्व काळाच्या तुलनेत बस अपघात आणि मृत्यूमध्ये २५ टक्के घट झाली आहे. तरीही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सतत सतर्कतेच्या गरजेवर भर दिला आहे. घाट व महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रात्रीच्या प्रवासात सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी चालकांना पुरेशी विश्रांती, सतर्कता महत्वाची आहे.

logo
marathi.freepressjournal.in