आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; सदावर्तेंनी केले शरद पवारांवर आरोप

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली
आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; सदावर्तेंनी केले शरद पवारांवर आरोप

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. २ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला असल्यामुळे त्यांनी आंदोलन पुकारले आहे. एसटी महामंडळाच्या तब्बल ८८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अजूनही झालेला नाही. असे असताना आता एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ येथील भीमराव सूर्यवंशी या एसटी चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमे समोर आली आहे. कवठेमहांकाळ एसटी आगारामध्ये ते चालक म्हणून सेवेत होते. त्यांनी आज सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कवठेमहंकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप त्यांनी आत्महत्या का केली? याची माहिती समोर आलेली नाही.

गेल्या २ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने सर्वजण पुन्हा एकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अशामध्ये, भीमराव सूर्यवंशी यांनी आर्थिक नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचल्याची चर्चा आहे. यावरून आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था समोर आली आहे. याबद्दल बोलताना एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्यामागे बँकांचे राजकारण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ठेवणीतील काही आधिकारी असल्याची गंभीर टीका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in