
एसटी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाल्याने त्याची देखील दिवाळी गोड होणार आहे. शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ६ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. शिंदे सरकारने जाहीर केल्यानुसार एसटी कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना ६ हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपायांचा बोनस देण्यात आला होता.
गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या बोनसच्या तुलनेत यंदा एका हजाराने वाढ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यंदा सरसकट १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, शिंदे सरकारने ही मागणी मान्य केली नाही. असं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार रुपयांनी बोनसमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.