
दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी प्रवास भाडेवाढ आजपासून लागू झाली आहे. आजपासून एसटीच्या प्रवासात 5 रुपये आणि 75 रुपयांची वाढ झाली असून ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. दिवाळीच्या काळात महसूल वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी अशी वाढ लागू केली जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. त्यामुळे दिवाळीला बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
भाडेवाढ रद्द करण्याची प्रवाशांची मागणी आहे
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दिवाळीचा बोनस दिला जात असला तरी दुसरीकडे मात्र ऐन दिवाळीत प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे त्यांना फरकाची रक्कम भरावी लागणार आहे.
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्यांच्याकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकिटाच्या किंमतीतील फरक आकारला जाईल. ही भाडेवाढ कुठेही एसटीच्या प्रवासाला तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थ्यांच्या पाससाठी लागू होणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपणार असून, नेहमीप्रमाणे भाडे आकारण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.