लोणावळा, कार्ल्यात पर्यटक पोलीस ठाणे सुरू करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संबंधितांना निर्देश

महाराष्ट्र डाक सर्कलतर्फे मुंबई जीपीओ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला.
लोणावळा, कार्ल्यात पर्यटक पोलीस ठाणे सुरू करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संबंधितांना निर्देश
एक्स @AjitPawarSpeaks
Published on

मुंबई : लोणावळा येथील आई एकवीरा देवी मंदिर परिसरातील विकासकामे तातडीने पूर्ण करा, आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोणावळा व एकवीरा देवी परिसरात पर्यटक पोलीस ठाणे सुरू करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच मवाळमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण व उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करा, असेही निर्देश अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले.

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून या प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकुल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात, मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले.

लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन पोलीस ठाणी स्थापन करण्यात येतील, महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातल्या महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी, महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.

पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या !

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर डोणे आढळे, वाढीव डोंगरगाव कुसगाव, पाटण व ८ गावे, कार्ला व ७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, खडकाळे, वराळे, देहू नगरपंचायत पाणीयोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला. या सर्व पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in