संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करा; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.

...उपाययोजना करा

संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान करण्यासाठी आल्यास त्या मतदाराकडून इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत आणि करणार नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. याबाबत मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सविस्तर आदेश निर्गमीत केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in