राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक कोटीचा गांजा पेटवला

पथकाने एका जेसीबीच्या साहयाने दहा बाय दहाच्या आकाराचा ७ फूट खोल खड्डा खोदला. त्यानंतर त्यात बांबू रद्दी व एका टेम्पोत आणलेला गांजा आणण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक कोटीचा गांजा पेटवला
PM

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा गांजा जप्त केला होता. पथकाने जप्त केलेला एक कोटी चार लाखांचा १ हजार किलो गांजा आज पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळील मैदानात पेटवून दिला. तासाभरात १ हजार ३२ किलो गांजा जळून खाक झाला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २०२२-२३ या कालावधीत सहा कारवायात जप्त केलेला गांजा आज गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे संचालक सुनील चव्हाण, उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांच्या उपस्थितीत एका खड्डा तयार करून पेटवून दिला. पर्यावरण विभाग, महसूल, अग्निशमन तसेच न्याय वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाईत जप्त केलेला गांजा जप्त करण्यात आला होता.

पथकाने एका जेसीबीच्या साहयाने दहा बाय दहाच्या आकाराचा ७ फूट खोल खड्डा खोदला. त्यानंतर त्यात बांबू रद्दी व एका टेम्पोत आणलेला गांजा आणण्यात आला. जागेवर त्याचे वजन करण्यात आले व नंतर खड्ड्यात टाकून गांजा पेटवून दिला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतुल कोवलवार, अभिजीत देशमुख, शरद फटांगडे, नारायण डहाके, आनंद चौधरी, गणेश पवार, तहसीलदार मुनलोड आदींची उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in