दिवाळीप्रमाणे गौरी गणपतीचा सण देखील होणार गोड ; 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दिवाळीप्रमाणे गौरी गणपतीचा सण देखील होणार गोड ; 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो हरभऱ्याची दाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे.

आज (१८ ऑगस्ट) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गौरी गणपती आणि दिवाळी साठी हा शिधा देण्यात येणार आहे. या बैठकीत अन्य महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आला आहे. तर महाराष्ट्र कॅसिनो कायदा देखील रद्द करण्यात आला आहे.

आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांना जोडणार

आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील १७ जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाडे, वाडे, वस्त्या या मुख्य रस्त्यांना जोडणार येणार आहे. 'भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना' याअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच हजार कोटींचा प्रस्ताव आहे.

अन्य महत्वाचे निर्णय

तसंच आजच्या या बैठकीत अन्य महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. ITI शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ म्हणून ५०० रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. तर मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुर्विकासासाठी परवानगी देण्यात आली आहे. या बैठकीत २०२३ चा सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. तसंच मंडणगड याठिकाणी दिवाणी न्यायालय उभारण्यात येणार आहे. असे महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in