देवगिरी महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

गीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते सकाळी ९:३० वाजता होणार असून, समारोप कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
देवगिरी महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा
PM

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. विनायकरावजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने २८ व २९ डिसेंबर रोजी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व, काव्यवाचन व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली. या तीनही स्पर्धेत मिळून १८ पारितोषिके देण्यात येणार आहेत, तर पारितोषिकांची रक्कम १, ६००० रुपये, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्र असे आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी 'बापू आम्हाला माफ करा', 'कोरोनोत्तर काळातील शैक्षणिक गुणवत्ता', 'राजकीय आरक्षण व महिलांचे वास्तव', 'नवीन शैक्षणिक धोरण : वास्तव आणि अपेक्षा' हे विषय तर वादविवाद स्पर्धेसाठी 'धर्मनिरपेक्ष राष्ट्र' ही भारताची ओळख वर्तमानकाळात पुसतचालली आहे/नाही' असे विषय ठेवण्यात आलेले आहेत. गीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते सकाळी ९:३० वाजता होणार असून, समारोप कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in