सांगली : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरू असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सांगलीच्या चारही संघांनी (पुरुष-महिला, किशोर-किशोरी) उपांत्य फेरी गाठली. तसेच धाराशीव, पुणे, मुंबई उपनगर यांनीही आगेकूच केली.
अकूज ड्रीमलँड येथे खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत किशोरी गटात ठाण्याने नागपूरचा १४-९ असा पराभव केला. प्रणिती जगदाळे (२.३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात ३ गडी), नेहा हलगरे (१.४० मि.) यांनी चमक दाखवली. किशोर गटात सांगलीने बुलढाण्यावर ११-७ असा विजय मिळवला. श्री दळवी (४ मि., ३ गडी), रितेश बिरादार (२.१० मि.) यांनी छाप पाडली.
महिला गटात पुण्याने नाशिकवर १०-८ अशी मात केली. प्रियांका इंगळे (४ मि.), स्नेहल जाधव (२.२० मि.), काजल भोर (१.४० मि., ४ गडी) या त्रिकुटाला विजयाचे श्रेय जाते. सांगलीने साताऱ्यावर ११-८ असे १ डाव व ३ गुणांच्या फरकाने वर्चस्व गाजवले. प्रतीक्षा बिराजदार (४.१० मि., २ गडी), सानिका चाफे (२.२० मि., ३ गडी) यांनी अफलातून कामगिरी केली. कोल्हापूरने मुंबई उपनगरवर १०-६ असे प्रभुत्व मिळवले.
पुरुषांच्या गटात मुंबईउपनगरने धाराशीववर १८-१४ अशी सरशी साधली. मग त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत मुंबई शहरचा २१-१३ असा धुव्वा उडवला. अनिकेत चेडवणकर (२ मि., १ गडी), धीरज भावे (१.५० मि.), निखिल सोडये (२.५० मि., ३ गडी) यांना विजयाचे श्रेय जाते. ठाण्याने कोल्हापूरला २०-१९ असे अवघ्या एका गुणाच्या फरकाने नमवले. आकाश साळवे, संकेत कदम त्यांच्यासाठी चमकले. सांगलीने सोलापूरला १८-११ असे नामोहरम केले. सौरभ घाडगे (३ मि., ३ गडी), अक्षय मासाळ (२ मि., ३ गडी) यांनी उत्तम योगदान दिले.
उपांत्य फेरीतील सामने
किशोरी गट : सांगली वि. सोलापूर, कोल्हापूर वि. धाराशीव
किशोर गट : सांगली वि. पुणे, सातारा वि. ठाणे
पुरुष गट : सांगली वि. पुणे, मुंबई उपनगर वि. ठाणे
महिला गट : सांगली वि. पुणे, कोल्हापूर वि.