नांदेडमध्ये रविवारी राज्यस्तरीय मातंग समाज शिक्षण परिषद

या कार्यक्रमास मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.
नांदेडमध्ये रविवारी राज्यस्तरीय मातंग समाज शिक्षण परिषद
PM
Published on

नांदेड : नवीन नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये येत्या रविवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता एकदिवसीय राज्यस्तरीय मातंग समाज शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्ण दिवसभर चालणाऱ्या या परिषदेमध्ये मातंग समाजाच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेऊन त्यांना विदेशातील उच्च शिक्षणाच्या दिशा, भारतातील सर्वोच्च शिक्षणाची दिशा, देशातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारीच्या संदर्भातील मार्गदर्शन, उद्योग, व्यवसाय, आयात - निर्यात संदर्भातील  मार्गदर्शन, शिक्षण हाच विकासाचा मूलमंत्र या विषयावर मातंग समाजातील विद्यार्थी व तरुणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. या परिषदेचे आयोजन नांदेडच्या आंबवडकरवादी मिशनतर्फे करण्यात आले आहे.

२१ देशाच्या आफ्रिकन युनियनचे सल्लागार डॉ. हरिभाऊ वाघमारे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक नंदन नांगरे, डॉ. यशवंत चव्हाण, वैशाली हळदेकर (ॲडीलेड युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया), डॉ. साळवे (मंत्रालय, मुंबई), प्रीती जमदाडे (मुख्य व्यवस्थापक, डीसीबी बँक), नीलम कांबळे (मुख्य अधिकारी), डॉ. प्रो. अनंत राऊत, बालाजी थोटवे, गुणवंत काळे, ॲड. शिवराज कोळेकर, शिवा कांबळे, प्रा. विनोद काळे, प्रदीप रोडे, दिगंबर मोरे, विजय रणखांबे, गवाले आदी मान्यवर उपस्थित विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in