मंत्री दिलीप वळसे-पाटील घरात घसरून पडले

ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरू करण्याच्या आधीच वळसे-पाटलांना अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे-पाटील यांना घरातून काम करावे लागेल.
मंत्री दिलीप वळसे-पाटील घरात घसरून पडले
Published on

मुंबई : राज्याचे मंत्री दिलीप वळसे-पाटील हे घरात पडून जखमी झाले आहेत. त्यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना अपघात झाला आहे. 'काल रात्री घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्यासमवेत सामाजिक कामात सक्रिय होईन’, असे ते म्हणाले.

बारामती, मावळ आणि शिरूर या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत उमेदवार कोण? अशा चर्चा सुरू आहेत. अजित पवार गटातून या लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे-पाटलांवर आहे. मात्र, ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरू करण्याच्या आधीच वळसे-पाटलांना अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे-पाटील यांना घरातून काम करावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in