राज्याचे पर्यटन धोरण पुढील आठवड्यात, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची जळगाव येथे माहिती

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे पर्यटनात मागे आहे. राज्यात पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने राज्यात सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यानुसार नवे पर्यटन धोरण आखणे सुरू आहे.
राज्याचे पर्यटन धोरण पुढील आठवड्यात, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची जळगाव येथे माहिती

जळगाव : अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे पर्यटनात मागे आहे. राज्यात पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने राज्यात सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यानुसार नवे पर्यटन धोरण आखणे सुरू आहे. पुढील आठवडयात राज्याचे नवे पर्यटन जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

केरळ, काश्मीर, गुजराथ व अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट हे पर्यटनात मागे आहे .पर्यटन हा राज्याचा मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे हे लक्षात घेता पर्यटनाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. धरणे समुद्र किनारे यांचे सामान्य माणसाला आकर्षण असते हे लक्षात घेऊन राज्यातील विविध धरणे, समुद्र किनारे यांचा पर्यटनाच्या भूमिकेतून विकास करणे गरजेचे आहे. शासनाकडे इतका पैसा नसल्याने बीओटी तसेच पीपीपी तत्वावर हा यांचा विकास करण्यात येईल. याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून, राज्याचे पर्यटनाचे नवे धोरण आखण्यात येत आहे जेणे करून राज्यात पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असे सांगत नवे पर्यटन धोरण पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

खान्देशासह राज्यात अनेक पर्यटन स्थळे असून, त्यांचा विकास करण्याची गरज असून, नव्या धोरणात त्याकडे लक्ष देण्यात येईल, असे सांगत जिल्ह्यातील वाघूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी केले जात असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी आमदार राजूमामा भेाळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी यांची उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in