डॉक्टर मारहाणप्रकरणी सोमवारी राज्यव्यापी बंद; कल्याण-डोंबिवलीतील सर्व डॉक्टर संघटनांचा सहभाग

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेने सोमवार, २० जुलै रोजी २४ तासांच्या राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.
डॉक्टर मारहाणप्रकरणी सोमवारी राज्यव्यापी बंद; कल्याण-डोंबिवलीतील सर्व डॉक्टर संघटनांचा सहभाग
डॉक्टर मारहाणप्रकरणी सोमवारी राज्यव्यापी बंद; कल्याण-डोंबिवलीतील सर्व डॉक्टर संघटनांचा सहभाग
Published on

डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेने सोमवार, २० जुलै रोजी २४ तासांच्या राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये कल्याण-डोंबिवलीतील सर्व डॉक्टर संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. ल. राजेश राघव राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणात प्रशासनाकडून झालेली कारवाई अपुरी असल्याचा आरोप करत आयएमएने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबतचा कायदा अधिक कठोर करणे, रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करणे, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी समुपदेशन समिती स्थापन करावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.

या २४ तासांच्या बंददरम्यान राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्या, तरी सर्वसाधारण बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच शासनाने ठोस आणि कठोर कायदेशीर कारवाई न केल्यास ९ ऑगस्टपासून बेमुदत बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही डॉक्टर संघटनांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला निमा, आयुर्वेद व्यासपीठ, होमिओपॅथिक डॉक्टर संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन तसेच आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in