

मुंबई : राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत लक्षात घेता पर्यटनस्थळी भटक्या कुत्र्यांना ‘नो एंट्री’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून यापूर्वीच राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. आता राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर आणि पर्यटन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या निवासस्थानांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.