

मुंबई : नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी राज्य सरकारने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. महाराष्ट्रातून नक्षलवाद कायमचा संपवण्यासाठी तेथील पोलीस स्टेशनचे बळकटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकार ५७ कोटी ५५ लाख ४० हजार रुपये खर्च करणार आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांच्या एक्सटेंड स्पेशल इन्फ्रा स्क्रीम या योजनेखाली २५ जानेवारी २०२३ रोजी प्रोजेक्ट क्लिअरन्स कमिटीची बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सुधारीत आराखड्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी १४ फोर्टफाईट पोलीस स्टेशनच्या कामांकरिता २१ मार्च २०२३ च्या पत्रान्वये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारने आराखड्यास मंजुरी दिली आहे.
नक्षलग्रस्त भागातील १४ पोलीस स्टेशनचे मजबुतीकरण करण्यासाठी ३५ कोटींचा खर्च करणार. जिल्हा पोलीस स्टेशनची काम करण्यासाठी ६ कोटी ९१ लाख ५० हजार खर्च करणार.