राज्यातील स्ट्रोक केअर बळकट होणार

बोहरिंगर इंगेलहेम इंडियाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार
राज्यातील स्ट्रोक केअर बळकट होणार

मुंबई : राज्यातील स्ट्रोक केअरच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकट करताना, रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार सेवेद्वारेराज्यभरातील रुग्णालयांमध्ये स्ट्रोक केअर सेवा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बोहरिंगर इंगेलहेम इंडियाने महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर सामंजस्याचा करार केला आहे.

राज्यातील स्ट्रोक केअरच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या या सामंजस्याच्या करारावर सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई येथे महाराष्ट्र सरकार, वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन, नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटिस,हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक पंजाब, एंजल्सइनिशिएटिव्ह आणि बोहरिंगर इंगेलहेम इंडियाच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

त्यावेळी डॉ. नागनाथ मुदाम, सहसंचालक एनसीडी, मुंबई, महाराष्ट्र आणि डॉ. श्रद्धा भुरे, वैद्यकीय संचालक, बोहरिंगरइंगेलहेम इंडिया, हे सामंजस्याच्या कराराच्या एक्सचेंजसाठी स्वाक्षरी करणारे अधिकारी होते.

स्ट्रोकमूळे मृत्यू होण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर

स्ट्रोक हे भारतातील मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण आहे. स्ट्रोकमुळे ७.७ लाख मृत्यूंसह देश जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे (४८.३%), ज्यामध्ये स्ट्रोक हे मृत्यूच्या शीर्ष १० कारणांपैकी एक आहे. स्ट्रोक आल्यानंतर पहिल्या ४ तासांत वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे असते. हा काळ सुवर्ण कालावधी म्हणून ओळखला जातो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in