लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवरून दरीत पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांची टीम दाखल झाली.
लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवरून दरीत पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
Published on

पुणे : लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवरून दरीत पडून साक्षी रमेश होरे (२१) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साक्षी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. साक्षी लोणावळ्याला कशासाठी आली होती? कुणासोबत आली होती? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. साक्षी कड्यावरून पाय घसरून खाली पडली की तिने आत्महत्या केली, हे समजू शकलेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांची टीम दाखल झाली.

logo
marathi.freepressjournal.in