विद्यार्थ्यांनी साजरा केला आजी-आजोबा दिवस!

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर व्हॅलेंटाइन-डे (प्रेम दिवस) म्हणून साजरा केला जातो. पण ही भारतीयांची संस्कृती नाही, हे लक्षात घेऊन...
विद्यार्थ्यांनी साजरा केला आजी-आजोबा दिवस!
Published on

विजय पाठक/ जळगाव

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर व्हॅलेंटाइन-डे (प्रेम दिवस) म्हणून साजरा केला जातो. पण ही भारतीयांची संस्कृती नाही, हे लक्षात घेऊन येथील उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूल या शाळेने बुधवारी हा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा केला. गेल्या २१ वर्षांपासून हा दिवस 'आजी-आजोबा' दिवस म्हणून विविध पद्धतीने तसेच विविध ठिकाणी ही शाळा साजरा करत असते.

व्हॅलेंटाईन डे साजरा करणे ही आपली संस्कृती नाही हे लक्षात घेऊन या शाळेच्या संस्थापक अध्यक्षा अनघा गगडाणी यांनी हा दिवस 'आजी आजोबा दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पालकांना ही कल्पना आवडली आणि गेल्या २१ वर्षांपासून शाळा हा दिवस मंदिरात, वृद्धाश्रमात उदयानात तेथे उपस्थित असलेल्या आजी आजोबांसमवेत साजरा करत असते. यंदा हा आजी-आजोबा दिवस शाळेत मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला. २०० हून अधिक आजी आजोबा या प्रसंगी उपस्थित होते. काही खास या दिवसासाठी बाहेरगावाहून आल्याचे शाळेच्याा मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा हातात हात घेऊन ते सदैव आपल्या आजी-आजोबांवर प्रेम करतील नेहमी त्यांचा आदर करतीलत्यांची काळजी घेतील आणि भविष्यात त्यांच्या आजी-आजोबांना वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही, अशी भावपूर्ण प्रतिज्ञा घेतली. शेवटी सर्व आजी- आजोबांनी आपल्या नातवंडांसोबत डब्बा पार्टीचा आनंद घेतला. यावेळी विविध खेळांमधील विजेत्या आजी-आजोबांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षिका राजश्री तिवारी, आणि साधना खरे यांनी केले. समन्वयक सुनयना चोरडिया यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता अध्यक्षा अनघा गगडाणी, विश्वस्त प्रवीण गगडाणी तसेच मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांचे मार्गदर्शन लाभले.

logo
marathi.freepressjournal.in