
गेल्या काही महिन्यांत गौतमी पाटीलचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. सुरुवातीला गौतमीचा अश्लील डान्स आणि नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाइन आणि ऑफलाइन पातळीवर झालेल्या टीकेमुळे गौतमी नेहमीच चर्चेत राहिली. या वादांमध्ये अनेकांनी गौतमीचा दोष निदर्शनास आणून दिला, पण त्यानंतर २४ फेब्रुवारीला असे काही घडले की, टीकाकारही गौतमीच्या बाजूने उभे राहू लागले.
काय होती ती घटना ?
गौतमीचे कपडे बदलताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बनवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. गौतमीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. गौतमीनी केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेही याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
24 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील कपडे बदलत असल्याचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि व्हायरल झाला. हा व्हिडिओ गौतमीपर्यंत पोहोचताच तिच्याच गटातील एका तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.