"असा अन्याय निजाम आणि इंग्रजांच्या काळतही नव्हता", मराठा आंदोलनकर्त्यांची राज ठाकरेंकडे व्यक्त केली खंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील आंदोलनकर्त्यांशी फोन वरुन संवाद साधत त्यांना आश्वस्थ केलं आहे.
"असा अन्याय निजाम आणि इंग्रजांच्या काळतही नव्हता", मराठा आंदोलनकर्त्यांची राज ठाकरेंकडे व्यक्त केली खंत
Published on

जालन्यातील मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असलेल्या अमरण उपोषणावर पोलिसबळाचा वापर करत अमानुष लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. अशात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या लाठीमारवेळी जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आश्वस्थ केलं. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील अंतवरील सराटीगावात हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. बाळा नांदगावकर यांनी या भेटीत आंदोलकाकर्त्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्याशी संवाद घडवून आणला. यावेळी राज ठाकरेंनी आंदोनकरत्यांना कोणतीही काळजी करु नका, असा धिर दिला.

जखमींची केली विचारपूस

मनेसे नेते बाळा नांदगावकर यांना आंतरवली सराटी गावातील आंदोलकांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. यावेळी राज यांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांना काळजी करु नका असं म्हणत धीर दिला. तसंच उपोषणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं. यावेळी प्रत्यक्ष गावात उपस्थित असणाऱ्या बाळा नांदगावकर यांनी देखील आंदोलन कर्त्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली.

यावेळी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जरांगे यांनी राज ठाकरे यांच्याजवळ त्यांची व्यथा मांडली. यावेळी त्यांनी आम्हालाच मारुन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचं सांगितलं. तसंच पाच ते सहा वर्षाच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आल्याचं जरांगे यांनी सांगितलं. आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत होतो. यावर आम्हाला काय बोलावं हेच कळत नाही. आम्ही निजामाच्या काळात देखील असा अन्याय पाहिला नाही आणि इग्रजांच्या काळत देखील असा अन्याय नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं. आंदोलन कर्त्यांना न्या मिळवून देऊ, असं म्हणत राज यांनी त्यांना आश्वस्थ केलं.

logo
marathi.freepressjournal.in