"...तर लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू": ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचा इशारा

महाराष्ट्रात जवळपास १२०० ऊस तोडणी मशीन कार्यरत आहे. या मशीन सुशिक्षित शेतकर्‍यांनी पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून कर्ज काढून घेतले
"...तर लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू": ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचा इशारा

पुणे : संपूर्ण राज्यात मशिन तोडणीचे दर एक समान करणे व वाहतूक दरवाढ जाहीर करणे अन्यथा ऊस तोडणी मशीन बंद ठेऊ. तसेच लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू. असा इशारा महाराष्ट्र ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे व अमोल राजे यांनी दिला. या संदर्भात एक निवेदन साखर आयुक्त पुलकुंडवार यांना महाराष्ट्र ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने दिला.

या शिष्टमंडळात गणेश यादव, किशोर जगदाळे, निलेश बगते यांच्या सह महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजगोंडा पाटील होते.

महाराष्ट्रात जवळपास १२०० ऊस तोडणी मशीन कार्यरत आहे. या मशीन सुशिक्षित शेतकर्‍यांनी पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून कर्ज काढून घेतले. परंतू पुढार्‍यांनी वेळोवेळी फसवी आश्वासने देऊन राष्ट्रीय कृषी विकास योजने विषयी मशीन मालकांची फसवणूक केली आहे. असा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे यांनी केला आहे.

या संदर्भात साळुंखे म्हणाले, अन्य राज्यांमध्ये चालू असणारी ही योजना राज्यात बंदी करण्यात आली आहे. गेल्या २ वर्षापासून केवळ जीआर काढणे व आश्वासन दिले जात आहे. या आर्थीक वर्षातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. इकडे ऊस तोडणी मजुरांची अवस्था बिकट आहे. परंतु त्यांच्यासाठी कार्यरत संघटनांनी तोडणी दर वाढवुन घेतले आहे. आज हात तोडणीचे दर कमीशनसह ३८० रूपये डोकी सेंटर ४३९ रू. गाडी सेंटर ४९० रू असे जाहिर झाले आहेत. परंतू आमची संघटना २०२० पासून उस तोडणी दर वाढीसाठी पाठपुरावा करतोय पण कोणीही दखल घेत नाहीत. डीझेलवर चालणार्‍या मशीनचे दर वेगवेगळ्या आहे. ३८० पासून ५०० रूपये पर्यंत प्रती टन आहेत. यात भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचा ऑपरेटिंग खर्च, हेल्पर, इनफिल्डर ड्रायव्हर, स्पेअर पार्ट, देखभाल, ऑईल, ग्रीस आणि दुरूस्ती याचा खर्च प्रती टन १०० रू. होतो. तसेच डीझेल, ऑपरेटींग, दुरूस्त असा एकुण ४६५ खर्च होतात. म्हणून यात २००रूपयांनी वाढ होणे अपेक्षित आहे. आजच्या स्थितिला लेबर दर वृध्दी, तोडणी दर हे दुप्पट झाले आहे. त्यामुळे मशिन तोडणी दर ७०० रूपये व वाहतुक दरात दुप्पटीने वाढ करावी.

सध्या हाताने तोडणी आणि बैलगाडी व मिनी टॅ्रकर गाडी यांची दरवाढ केली आहे. परंतू इतरांवर अन्याय झालेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in