धक्कादायक! पहिल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मुलीने संपविले जीवन

१४ वर्षाच्या मुलीने मंगळवारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलींच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी तिला कांदिवली येथील जनकल्याणनगर सामान्य रुग्णालयात दाखल केल होते. परंतु, डॉक्टरांनी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास मुलीला मृत घोषित केले.
धक्कादायक! पहिल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मुलीने संपविले जीवन

मुंबई : मालाडच्या मालवणी, खारोड परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. पहिल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबाबही नोंदविला आहे.

१४ वर्षाच्या मुलीने मंगळवारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलींच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी तिला कांदिवली येथील जनकल्याणनगर सामान्य रुग्णालयात दाखल केल होते. परंतु, डॉक्टरांनी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास मुलीला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांचा जबाब नोंदविला. पालिकांनी कोणावरही तक्रार दाखल केली नाही. पहिल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे आहत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. यानंतर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बुधवारी पालिकांना मुलीचा मृतदेह सोपवण्यात आला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in