राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी ठरल्या आहेत.
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी ठरल्या आहेत. सुजाता सौनिक यांनी यापूर्वी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर आता त्यांची मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून रविवारी संध्याकाळी ५ वाजता त्यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी-

देशभरातील अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर यशाच कळस गाठला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत देशातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत महिला कार्यरत आहेत. याचंच आणखी एक उदाहरण राज्यात पाहायला मिळालं. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक (Sujata Saunik IAS) यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत.

सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्या मुख्य सचिवपदाची विराजमान झाल्या आहेत. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

कोण आहेत सुजाता सौनिक?

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. सुजाता कौशिक यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा विविध पंदावर गेल्या तीन दशकांपासून कार्यरत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in