खोतकर, तनपुरे यांना समन्स

ईडीने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, १९८५-८६ मध्ये नागपुरच्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मे. राम गणेश घटकारी सहकारी साखर कारखाना स्थापन केला.
खोतकर, तनपुरे यांना समन्स
PM
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विशेष खासदार व आमदार न्यायालयाने माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे, त्यांचे वडील प्रसाद तनपुरे, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, बिल्डर जुगल किशोर तापडिया व उद्योगपती पद‌्माकर मुळे यांना नोटीस बजावली आहे.

या सर्वांना १२ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २४ व २५ ऑगस्ट रोजी ईडीने दोन तक्रारी दाखल केल्यानंतर न्यायालयाने हे समन्स बजावले.विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी आरोपींच्याविरोधात पुरावे आहेत.

ईडीने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, १९८५-८६ मध्ये नागपुरच्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मे. राम गणेश घटकारी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. सुरुवातीला हा कारखाना चांगला चालला होता. मात्र, अनेक वर्षे गैरव्यवस्थापनामुळे तो तोट्यात गेला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज त्यांना फेडता आले नाही. त्यानंतर हा कारखाना १२.९५ कोटी रुपयांना विकण्यात आला. या कारखाना विक्रीची राखीव किंमत २६.३२ कोटी रुपये होती. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर ॲॅण्ड अलाईड ॲॅग्रो प्रा. लिमिटेडने विकत घेतला. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळात होते.

logo
marathi.freepressjournal.in